
टेम्पो खरेदीच्या व्यवहारामध्ये 3 लाख 21 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष सिध्देश्वर तोडकरी आणि रवीकांत प्रल्हाद मोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत बसप्पा कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 ऑगस्ट 2020 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आणि रवीकांतने श्रीकांत कुंभार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी आशिष तोडकरी यांच्याकडील टेम्पो असल्याची बतावणी केली. टेम्पोवर असलेल्या विमा कंपनीचे लोन वापरण्यास मिळेल असे अमिष दाखवुन गाडीचा विक्री व्यवहार केला. त्यासाठी वकीलांच्या समोर नोटरी करून एकूण 3 लाख 21 हजार रूपये श्रीकांतकडून घेतले. दरम्यान हा टॅम्पो सोलापूर येथील दत्तात्रय साळुंके यांच्या मालकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीकांत यांनी तक्रार दिली आहे.

























































