शहरातील आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिसाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

पोलिस दलातील अधिकाऱ्यासह कर्मचारी रात्रंदिवस ड्युटीवर आहेत. त्यामुळे संपर्कातून काही दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोघांवर पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. संबंधीत पोलिसांच्या संपर्कात आलेल्या १४ पोलिसांना तत्काळ क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांनतर त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यासंदर्भात मंगळवारी अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार, दोन पोलिसांचा अहवला पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यासमवेत असलेल्या आणखी दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पोलिसांना संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही मास्क, फेस शील्ड, ग्लोज अशा सर्व वस्तू देत आहोत. कामाच्या ठिकाणी व घरी गेल्यावर काय काळजी घ्यावी, याबाबत पोलिसांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. पोलिसांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्र आणि त्यांची टीम व डॉक्टरांची टीम काम करत आहे. पोलिस प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.