पुणे – दुचाकी कठड्याला धडकल्याने तरूण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगातील दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून संचेती पुलावरील जंक्शनच्या कठड्याला दुचाकी धडकल्याने जखमी असलेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. मागील सव्वा महिन्यापासून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मिंटु रफिक राईन (वय 25, रा. संगमवाडी, मुळ रा. पाली, दरभंगा, बिहार) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा अपघात 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला होता.

मिंटू मुळचा बिहारचा असून तो चिकनच्या दुकानात कामाला होता. 20 ऑगस्टला दुपारच्या सुमारास दुचाकी कठड्याला धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गेल्या सव्वा महिन्यापासून तो उपचार घेत होता. उपचार घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार पी. टी. न्यायनीत करीत आहेत.