पालखी सोहळ्यात तीन महिलांचे दागिने चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन तीन महिलांचे 1 लाख 80 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 22 जूनला दुपारी तीनच्या सुमारास येरवड्यातील इंदिरानगर परिसरात घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी महिला त्यांच्या दोन मैत्रिणींसह माउलींच्या दर्शनासाठी इंदिरानगर परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्यासह मैत्रिणीच्या गळ्यातील 1 लाख 80 हजारांचे दागिने चोरून नेले. काही वेळानंतर महिलांना दागिने चोरी गेल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करीत आहेत.