पुणे – येरवड्यात तरुणावर वार, चार जण अटकेत

खून्नस देत 10 ते 12 जणांच्या एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील शेलार चाळ परिसरात प्रकार घडला. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.

आरोपी रुपेश उर्फ दाद्या राजगुरू, अनिकेत उर्फ दत्ता साठे, रौनक चव्हाण, रोहन साळवे, अक्षय सोनवणे, अमोल भिसे, आदित्य घमरे, आर्यन घमरे, शक्ती यांच्यासह आणखी चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम जगन्नाथ शेडगे (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे. किरकोळ कारणांवरून आरोपी मागील एक महिन्यापासून शुभमचा मित्र आदेश जगताप यांना खून्नस देऊन पाठलाग करीत होते.

बुधवारी दोघेही येरवड्यातील शेलार चाळ परिसरातून जात असताना आरोपी शस्त्र घेऊन त्याठिकाणी आले. त्यांना पाहून फिर्यादी शुभमचा मित्र आदेश पळून गेला. त्यानंतर आरोपींनी शुभम शेडगे त्याच्यावर शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या