पुणे – तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

848

शहरात आत्महत्येचे सत्र कायम असून आज सकाळी चव्हाणनगरमधील शंकर महाराज वसाहत येथील एका तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांनंतर आजुबाजुला दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आत्महत्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

इंद्रजीत लक्ष्मण बनकर (वय 37 ,रा. शंकर महाराज वसाहत ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दुर्गंधी आल्याने आजूबाजूच्या नागरिकांना पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी दार उघडण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. इंद्रजीत मूळचे चाकणचे असून कोणताही कामधंदा करत नव्हते. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत. अधिक तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय गायकवाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या