
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते. मात्र पुण्यातील प्रेमी युगुलांना त्यांच्यासाठी पुण्यात एकही बगीचा किंवा निवांत वेळ घालवता येईल अशी जागा नसल्याची उणिव भासत आहे. त्यामुळे पुण्यातील काही तरुणांनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बगीचा हवा अशी मागणी केली आहे.
‘राईट टू लव्ह’ अशी मोहीम या तरुणांनी सुरू केली असून त्या अंतर्गत त्यांनी ही मागणी केली आहे. ‘पुण्यात 110 बगीचे आहेत मात्र एकही बगिच्यात प्रेमी युगुलांना निवांत वेळ घालवता येत नाही. त्यामुळे या युगुलांना निवांत वेळ घालवता यावा असा एखादा तरी बगीचा पुण्यात असायला हवा, अशी मागणी पुण्याच्या महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर यावर निर्णय घेण्यात आला नाही तर पुणे महानगर पालिकेबाहेर आंदोलन करू असा इशाराही या तरुणांनी दिला आहे.

























































