
पुणे शहरातील झेड पुलानजिक शुक्रवारी रात्री एका चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन ते चार जण जखमी झाले आहेत.
झेड पुलाकडून टिळक चौकाकडे जाताना हा अपघात झाला. यात एका भरधाव चारचाकी स्कोडा गाडीने पाच ते सहा वाहनांना उडविले. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.
रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, धडक दिलेल्या वाहनांमध्ये एका काही रिक्षा होत्या. त्यामुळे यातील काही प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


























































