आफ्रिकेमध्ये ऊबंटू जमातीत आरोपीला शिक्षा होते जगावेगळी! जाणून घ्या यामागचे कारण…

आफ्रिकेमध्ये ऊबंटू ही एक आदिवासी जमात आहे .या जमातीत एखाद्याकडून गुन्हा झाला किंवा चूक झाली, तर त्याला शिक्षा करण्याची पद्धत आगळीवेगळी आहे. ही पद्धत जगातल्या शिक्षा देण्याच्या पद्धतीत आदर्श आहे. जगात शिक्षा सुधार प्रणालीने धडा घ्यावा अशी आहे. सर्व देशातील गुन्हेगारी पद्धतीला धडा देणारी आहे .

ऊबंटू या आफ्रिकेतील आदिवासी जमातीत जर कोणाकडून काही चूक झाली, तर त्याला गावाच्या मध्यावर आणून बसवितात. पूर्ण गाव दोन दिवस त्याला चौकात बसवतात व त्या दोन दिवसात सर्व जमातीतील लोक त्याच्या भोवती बसतात. त्या दोन दिवसात त्या व्यक्तीच्या मागील आयुष्यात त्याने जे जे चांगले काम केलेत त्याविषयीचे अनुभव सांगतात. या जमातीत विश्वास आहे की प्रत्येक माणूस चांगला असूनही त्याच्याकडून प्राप्त परिस्थितीत कधीही आणि काहीही चुका होऊ शकतात. वास्तविकता ही आहे की त्याला मानसिक मदतीची गरज असते, तेथे एकत्रित येऊन या प्रथेला आणि त्या व्यक्तीला प्रोत्साहित करतात की त्याने पुन्हा आपल्या चांगुलपणाला स्वीकारावे. या प्रक्रियेत हा विश्वास आहे की, हीन नजरेने पाहणे किंवा दंड करण्यापेक्षा एकता व अखंडता माणसात बदल घडण्यास अधिक उपयुक्त असतात.

या पद्धतीतील मूलभूत तत्वे अशी आहेत

– करुणा, क्षमा, दया, माफी पुन्हा जोडून घेणे व गुणगौरव करण्याचे प्रयत्न करीत राहावे.

– प्रत्येक मानव जीवनाचे मूल्य समजून असावे.

–  प्रत्येक व्यक्तीचे वागणे दुसऱ्यावर परिणाम करते कारण आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत.

–  प्रत्येकाची प्रतिष्ठा माणुसकी, आदर अत्युच्च स्तरावर ठेवण्याची कला आपणास अंगीकारावी लागते.

–  विवाद टाळून एकात्मतेकडे जावे लागते.

–  विचार करण्यात नेहमी सकारात्मकता असावी व एकमेकांना समजून घ्यावे.

–  कुणासही विजय मिळवून देणारा न्याय करण्यापेक्षा समन्वयासाठी समानता प्रतिष्ठा बनवीत राहणे जरुरी आहे.

–  वेगळे होण्याऐवजी जोडण्याला अधिक महत्व देणे सुरू करू या, लज्जित करणे वा दंडित करणे यापेक्षा आपसातील समज आणि शिकण्याची प्रक्रिया प्रोत्साहित करावी.

– समाज विकसित करणे आणि परिणामांवर वाद-विवाद किंवा ताकदवानाच्या विजयापेक्षा समोरासमोर बोलण्याची पद्धत अवलंबावी.

– शब्दसंवाद आणि चारित्र्य टिकवणे महत्त्वाचे.

समाजात चांगल्या चारित्र्यवान व्यक्तीकडून अक्षम्य गुन्हे घडतात. काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन प्राध्यापकाने लग्नाला 22 वर्ष झाल्यानंतर आपल्या व्यवस्थापकीय पदावर असलेल्या पत्नीची ब्लेडने गळा चिरुन हत्या केली. कायदा फक्त अशा बेभान वर्तुणुकीला गुन्हा ठरवितो, पण त्या व्यक्तीचे अगोदरचे वर्तन कधीच विचारात घेत नाही. नेमकी हीच पद्धत ऊबंटू जमातीत त्या व्यक्तीच्या मागील वर्तणूकीची दखल घेऊन केली जाते. आपण आदिवासींना अप्रगत समजतो. सर्वात हीन समजतो. काय त्यांचे कपडे? काय त्यांचं राहणीमान ? असे म्हणून तुच्छ लेखतो. परंतु आफ्रिका सारख्या मागास खंडातील अत्यंत मागास जातीतील चुकलेल्या माणसाला, गुन्हा करणाऱ्या माणसाला सुधारण्यासाठी वापरलेली ही पद्धत अदभूत आणि प्रगत राष्ट्रांना विचार करायला लावणारी आहे. प्रत्येक माणूस चुकतो, गुन्हा केला म्हणून तो आयुष्यभरासाठी गुन्हेगार होऊ शकत नाही, त्याला त्यातील सद्गुणांची जाणीव करून देऊन, भविष्यात त्याच्याकडून असा गुन्हा होऊच नये म्हणून एक दोन नव्हे तर सर्व समुदाय वदवून घेतात. त्याला त्याच्या गुन्ह्याच्या गांभीर्याची जाणीव करून दिली जाते.

चुकला म्हणजे जेलमध्ये पाठवा, खून केला म्हणजे फासावर द्या किंवा जन्मठेप सारखी शिक्षा द्या, अशा गोष्टीवर या समाजाचा विश्वास नाही, तर तो प्राप्त परिस्थितीत का चुकला, आणि त्याच्यात सुधारणा घडवून आणणे हे त्यांचे तत्वज्ञान आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार ती कशी द्यावी, यासंदर्भात जगातील गुन्हे शास्त्र शिक्षेचा प्रस्ताव देत असतील. वरील पद्धतीत जे आढळले ते कमालीचे वैशिष्टपूर्ण आहे. जगातली मागास जमात एका चूकलेल्या माणसाला, सुधारणेला सामुदायिक वाव देते, एवढेच नव्हे तर तो समाज समुदायाचा घटक आहे .”तुझ्यामुळे समाज ओळखला जात आहे तू चारित्र्यशील तर समाज चारित्र्यशिल ओळखला जाईल”, याबाबीस प्राधान्य देणारी आहे. चुकला म्हणून लगेच दोषारोप न करता, वाद-विवाद न करता, त्याला लज्जित न करता, त्यांना दंडित न करता, समाजापासून न तोडता, समाज जोडण्यावर या पद्धतीचा भर आहे.

सर्वात म्हणजे नकारात्मकता काढून सकारात्मकता ठेवा, याला ही पद्धत प्राधान्य देते. गुन्हेगारी निर्मूलनासाठी मागास जमातीतील ही पद्धत विचार करायला लावणारी आहे. कोण प्रगत आणि अप्रगत? प्रगत आणि अप्रगतचे नियम कोणते, हे कोणी ठरवले? त्यापेक्षा त्याची मूल्य व्हॅल्यू खूप मोठी आहे. अनेक बाबीस वादविवाद मोठ्या संघर्षाचे कारण आहे. वादविवाद टाळण्यावर ही पद्धत सर्वोच्च प्राधान्य देते. मानवतेला प्राधान्य देते. मानव एक हेच सांगते. ही पद्धत लिंगभेद मानत नाही हे विशेष आहे. जन्माला येणाऱ्या माणसाकडून चूक होऊ शकते. परंतु त्याने गुन्हा का केला, याचे विवेचन करून, त्याच्यातले चांगले गुण किती श्रेष्ठ दर्जाचे आहे, हे सांगण्यासाठी हा समाज तब्बल मौल्यवान असे दोन दिवस देतो. एक माणूस सुधारायला पूर्ण समाज आपली शक्ती पूर्ण शक्तीनिशी खर्च करतो. तोडणे सोपे जोडणे कठीण, हा अहिंसा आणि शांततेचा संदेश पाळणारी ही जमात आहे.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना निवृत्त वायुसैनिक आणि वस्तु सेवा कर अधिकारी एकनाथ वाघ यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या