पंजाबमध्ये पोलिसच दुकान लुटून पळाला…चौकात लोकांनी पकडले आणि….

police

पंजाबमध्ये पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली आहे. पंजाबमध्ये एका पोलिसानेच साथीदारांसह एक दुकान लुटले. त्यानंतर तो पळून जात असतानाच चौकातच लोकांनी त्याला पकडले. त्याला पकडण्यात आल्यावर याआधीही त्याच्यावर चोरी आणि लूटीचे आरोप झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेने पोलिसांची प्रतीमा मलीन झाली असून लूट करणाऱ्या पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बाबा बकाला भागातील एका महिलेच्या दुकानात साथीदारांसह डल्ला मारून पोलिसाने पळ काढला. त्यावेळी चोरीची घटना लक्षात आल्याने महिला दुकानदार आणि नागरिकांना आरडाओरडा केला. त्यामुळे तो पोलीस जास्त दूर जाऊ शकला नाही. त्याला जवळच्या चौकातच लोकांनी पकडले. त्यानंतर त्याची धुलाई करत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

घटनास्थळी पोलिसांचे पथक आल्यावर चोरी करणारा गुलशेर सिंह नावाचा पोलीस कर्मचारी असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. याआधीही त्याच्यावर चोरी आणि लुटीच्या घटनांचे आरोप झाले आहेत. मात्र, या महिलेच्या दुकानात दोन साथादीरांसह डल्ला मारल्यानंतर त्याला लोकांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले आहे. दुकानदार महिला आणि परिसरातील सतर्क नागरिकांमुळे या पोलीसाला पकडण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला अचक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांची प्रतीमा मलीन कराऱ्या गुलशेर सिंहविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबाबतची माहिती देत कठेर कारवाई करण्यात येईल, असेही अधीक्षकांनी सांगितले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर याआधीही आरोप झाले असताना त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. आता त्याला रंगेहात पकडण्यात आल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या