पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना जीवे मारण्याची धमकी, पोलोनियमने संसर्ग केल्याचा खलिस्तानी संघटनेचा दावा; रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांना पोलोनियम या किरणोत्सरी घटकाचा संसर्ग करण्यात आलाचा दावा खलिस्तान नॅशनल आर्मी या खलिस्तान समर्थक संघटनेने केला आहे. त्यातून ते वाचले तर माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्यासारखे हाल करू, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.

मान यांना रक्तदाब वाढल्यामुळे मोहाली येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी सोमवारी एका रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांना पुन्हा सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही बुलेटीन जारी केलेले नाही.

किती धोकादायक आहे पोलोनियम?

पोलोनियम-210 हा एक किरणोत्सरी घटक आहे. ते अतिशय विषारी मानले जाते. त्याचा संसर्ग झाल्यास शरीराचे अंतर्गत अवयव तसेच डीएनए वेगाने नष्ट होतात. बोन मॅरो, लिव्हर तसेच किडनीवर गंभीर परिणाम होतो. त्यावर कोणताही उपाय नाही. मान यांना कसे आणि कुठे पोलोनियमचा संसर्ग करण्यात आला, याबाबत खलिस्तानी संघटनेने माहिती दिली नाही.