
श्वेता पवार, मुंबई
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या विजेतेपदासाठी घमासान रंगले आहे. शेवटचे चार आठवडे उरल्याने सर्व स्पर्धक विजेतेपदासाठी काहीही करायला तयार होत आहेत. पुष्कर हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे आणि तो देखील जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे दिसून येतेय. आजचा टास्क पूर्ण करण्यासाठी पुष्करने चक्क बिकिनी घातली आहे. बिकिनी घालून पुष्कर आस्तादची छेड काढणार आहे.
बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांना ‘होऊ दे चर्चा’ हे आठवड्याचे कार्य दिले होते. त्या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची बाहेरच्या जगात चर्चा होईल असे काहीतरी करायचे आहे. त्या टास्कसाठी पुष्करने चक्क फ्लूरोसंट रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच तो आस्तादची छेड काढणार आहे. पुष्करचा हा बिकिनीमधला अंदाज त्याला हा टास्क जिंकवून देतो की नाही हे पाहण्यासारखे असेल.


























































