
टेलिव्हिजन विश्वात ‘क्यू मराठी’ नवीन वाहिनी 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्यू मराठी’ वाहिनीवर हटके मनोरंजनाची मेजवानी असेल. डिजिटल विश्वातल्या भन्नाट गोष्टी प्रेक्षकांना पहिल्यांदाच टीव्हीवर पाहायला मिळतील.
‘क्यू मराठी’ वाहिनीवर युवा वर्ग तसेच ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना आवडतील, असे कार्यक्रम सादर होतील. गेल्या दहा वर्षांमध्ये मनोरंजनाची परिभाषा बदलल्याने टेलिव्हिजन विश्वातदेखील खूप बदल घडले आहेत. प्रेक्षकांची बदलणारी अभिरुची लक्षात घेऊनच ‘क्यू मराठी’ वाहिनी कार्यक्रम सादर करणार आहे. क्यू यू मीडिया कंपनीच्या ‘द क्यू’ या हिंदी वाहिनीनंतर प्रादेशिक भाषेतली ही पहिलीच वाहिनी असेल.
मराठी टेलिव्हिजन विश्वात आता नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘क्यू मराठी’ प्रथमच डिजिटल विश्वातले सगळ्यात लोकप्रिय स्टार्स आणि त्यांच्या गोष्टी मराठी वाहिनीवर आणत आहे असे वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आशुतोष बर्वे यांनी सांगितले.


























































