
दीपावलीला विविध सुबक वस्तू आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असते. नागरिक या सणानिमित्त आवडत्या वस्तू आणि पदार्थांची मनसोक्त खरेदी करतात. राज्याच्या कारागृह विभागानेदेखील नागरिकांसाठी दर्जेदार वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध केले आहेत.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात दिवाळीनिमित्त पैद्यांनी बनवलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शास्त्र्ाज्ञ व संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDOD) प्रदीप एम. कुरुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दंतचिकित्सक डॉ. भारती कुरुलकर, पश्चिम विभाग कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक (मुख्यालय) सुनील ढमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.’
कंदील, उटणे आणि बरेच काही
या वर्षी इतर फर्निचरसोबत पैद्यांनी दिवाळी सणानिमित्त आकाशकंदील, उटणे, आकर्षक पणत्या, फराळाच्या वस्तू बनवून विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.


























































