विचारा तर खरं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

एका बँकेकडून पूर्वी घेतलेल्या गृहकर्जाचा ईएमआय तीन महिन्यांपूर्वी वाढवून घेतला. कर्ज मागणीच्या वेळी माझा सिबिल स्कोर 742 होता. माझ्या पगारात वाढ झाल्याने मला माझी ईएमआय रक्कम आणखी वाढवायची आहे. माझ्या कर्जावरील व्याजदर 9.5 टक्के आहे. ही बँक तसेच अन्य बँका नव्या गृहकर्जधारकांना 8.4 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. मी ईएमआय रक्कम वाढवून व्याजदर कमी करण्याची विनंती केली असता ईएमआय रक्कम वाढवू न देता ते माझ्या सिबिल स्कोअरनुसार ते व्याजदर 9.45 टक्के करून देण्यास तयार आहेत. माझा सिबिल स्कोअर अजून वाढला असावा असे माझे मत आहे. मी नेमपं काय करू? – नंदकुमार गायकवाड, कुलाबा

उत्तर – आपला सिबील स्कोर मुळातच उत्तम आहे. तो नक्की किती आहे ते आपल्याला वर्षातून एकदा मोफत जाणून घेता येते. आपण कर्ज घेताना बँकेबरोबर एक करार केलेला आहे. त्यात असलेल्या काही गोष्टी तपासून पहा. उदाहरणार्थ, कर्जावरील व्याज फिक्स आहे की फ्लोटिंग, व्याजदरात बदल कसा होईल, कर्ज मुदत, अंशतः किंवा पूर्णतः मुदतपूर्व कर्ज फेडण्याचे नियम, दंडव्याज इत्यादींचा त्यात उल्लेख असेल. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी यापूर्वी आणि अलीकडे एक पत्रक काढून सर्व बँकांना गृहकर्जधारकास ईएमआय तोच ठेवून कर्ज मुदत वाढवणे अथवा ईएमआयची रक्कम वाढवून गरजेनुसार त्याची संख्या निश्चित करणे किंवा दोन्ही गोष्टी एकत्रित करणे असे पर्याय देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कर्जावरील व्याजदर एक टक्क्याने कमी झाल्यास आणि सोबत ईएमआयची रक्कम वाढवल्यास आपले एकूण देय व्याज मोठय़ा प्रमाणात कमी होऊन आपण लवकरच कर्जमुक्त व्हाल. एकतर आपल्या मागणीची बँकेस लेखी अथवा मेलवर विनंती करून पाठपुरावा करावा किंवा अन्य ठिकाणी आपल्या अटींनुसार कर्ज बदलून (लोन ट्रान्सफर) घेता येण्याचा पर्यायही आहे.