
सामना ऑनलाईन । पाटणा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील माजी आमदाराचे समर्थन केले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राज बल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकले. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला.
Rabri Devi in Nawada: Sabhi logon se meri appeal rahegi, jis tarah se Raj Ballabh (rape convict) ji ko ye log phasane ka kaam kiya, jail bhejne ka kaam kiya, yadavon ko badnaam karne ka kaam kiya hai. Vibha Devi pratyashi hain, Vibha Devi ko jitane ka kaam kariyega(4.4.19) #Bihar pic.twitter.com/aBULtoHoVd
— ANI (@ANI) April 5, 2019
आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राज बल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. विभा देवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या राबडी देवी यांनी त्यांचा प्रचार करताना राज बल्लभ कसा निर्दोष आहे आणि सरकारकडून त्याला गोवण्यात आले आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याला कोर्टाने दोषी ठरवले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले आणि गंभीर बाब म्हणजे राज बल्लभला झालेली शिक्षा हा यादवांचा अपमान असल्याचे भरसभेत म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी जेडीयू आणि भाजपने आक्षेप घेतला आहे.

























































