माझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

76

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्रींचे अनेक खासगी व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात चित्रपटातील हॉट सीन किंवा शूटींगदरम्यानचे सीन असतात. अभिनेत्री राधिका आपटेची देखील एक न्यूड क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपविषयी राधिकाच्या आधी तिच्या आईला याविषयी समजले होते. राधिकाने स्वत: याबाबत एका मुलाखतीत सांगितले आहे.

radhika-apte

नवभारत टाईम्सला दिलेल्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये राधिकाची एक न्यूड क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनुराग कश्यप यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये तिने हा न्यूड सीन दिला होता. त्यावरून राधिकावर प्रचंड टीकाही झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये राधिकाच्या पार्च्ड चित्रपटातील एक सेक्स सीन व्हायरल झाला होता. या चित्रपटातही तिचा टॉपलेस सीन देखील खूप व्हायरल झालेला.

‘सर्वप्रथम मला त्या न्यूड क्लिपविषयी माझ्या आईकडून समजले. त्यानंतर काही वर्षांनी पार्च्ड मधला जो सीन व्हायरल झाला होता त्या विषयी मला माझ्या ड्रायव्हरने सांगितले होते. मी या गोष्टींकडे फार लक्ष दिले नाही. मला हवं ते मी करू शकते त्यामुळे लोकं त्यावर काही बोलू शकत नाही’ असे राधिकाने एका मुलाखतीत सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या