
अबुधाबीमध्ये गेल्या आठवडय़ात खेळलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालला मायदेशी परतल्याकर कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या गृहविलगीकरणात असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार महिन्यांहून अधिक काळानंतर आपला पहिला सामना खेळलेला नदाल अबुधाबी येथील स्पर्धेत गेल्या शुक्रवारी इंग्लंडच्या ऍण्डी मरेकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला. वॉशिंग्टनमध्ये लॉयड हॅरिसकडून पराभूत झाल्यापासून नदाल ऑगस्टच्या सुरुवातीपासून कोर्टवर उरतला नव्हता. विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक आणि यूएस ओपन स्पर्धेलाही तो मुकला होता.























































