राफेलवर ‘ॐ’ गिरवला, संरक्षणमंत्र्यांकडून फ्रान्समध्ये विधीवत शस्त्र पूजन

2902
rajnath-singh-rafale

हिंदुस्थानच्या लष्कराच्या करारांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं ‘राफेल’ हे लढाऊ विमान अखेर हिंदुस्थानकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. याच दिवसाचे औचित्य साधत हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी फ्रान्समध्ये उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी पहिल्या राफेल विमानाचे विधीवत पूजन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या हाताने ‘ॐ’ गिरवला. पवित्र मंत्राचे उच्चारण यावेळी करण्यात आले. तसेच पवित्र रक्षा दोरा देखील विमानाच्या पंखांना गुंढाळण्यात आला. राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून मग विमान पुढे नेण्यात आले. अशा पारंपारिक पद्धतीने राफेल पूजन झाले आणि त्यानंतर पहिले लढाऊ राफेल हिंदुस्थानात दाखल झाले.

हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ हे लढाऊ विमान दाखल झाले आहे. हे विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समधील मेरीनेकच्या दसॉ हवाई तळावर आहेत. त्यांच्याहस्ते राफेलचे शस्त्रपूजन झाले आहे. तसेच हिंदुस्थान आणि फ्रान्सदरम्यान महत्त्वाच्या संरक्षण कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या