टीम इंडियाची ‘द वॉल’ भाजपच्या वाटेवर? जे.पी. नड्डांच्या भेटीने चर्चेला उधाण

1369

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्रासह हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या दोन्ही राज्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपमध्ये सध्या विविध पक्षांच्या आयारामांची गर्दी झाली आहे. विरोधी नेत्यांसह, अभिनेत्री, अभिनेत्यांसह क्रिकेटपटूही या गर्दीत पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान टीम इंडियाचा ‘द वॉल’ याने कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

रविवारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगळुरू येथे राहुल द्रविड याची भेट घेतली आहे. त्यामुळे तो भाजपमध्ये प्रवेश करणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे झारखंड दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली होती. त्यावेळीही अशीच चर्चा रंगली होती.

भाजपच्या राष्ट्रीय एकता मोहीमे अंतर्गत जे.पी. नड्डा आणि महासचिव मुरलीधर राव यांनी राहुल द्रविड याची भेट घेतली. यावेळी राव म्हणाले की, ‘प्रतिभावान खेळाडू आणि द वॉलच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडची आम्ही भेट घेतली. राष्ट्रीय एकता मोहीमे अंतर्गत ही भेट घेण्यात आवली. यावेळी राहुल द्रविड याला जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करण्याचा फायदा सांगितला. यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.’

आपली प्रतिक्रिया द्या