गांगुली-द्रविड इन ऍक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sourav ganguly and rahul dravid

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली व राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा प्रमुख राहुल द्रविड यांच्यामध्ये बुधवारी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीसाठी रोडमॅप तयार करण्यात आला. या ऍकॅडमीला नव्या उंचीवर नेऊन जाण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली.

सौरभ गांगुली याने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या पदाधिकाऱयांसह जिथे नवी इमारत उभी राहणार आहे त्या जागेची पाहणीही केली. कर्नाटक सरकारने सेंटर ऑफ एक्सिलेन्सच्या उभारण्यासाठी 40 एकरची जागा बीसीसीआयला दिली असून यामध्ये तीन मैदाने, इनडोअर नेटस् व आदी बाबींचा समावेश असणार आहे.