ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही काँग्रेसची चूक, राहुल गांधी यांनी केले मान्य

80च्या दशकात काँग्रेसने ज्या काही चुका केल्या, मी त्यांची जबाबदारी घेण्यास तयार आहे असे सांगतानाच, 1984 चे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही चूक होती, ही बाब लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मान्य केली. अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात एका खुल्या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी एका विद्यार्थ्याने त्यांना शीख दंगली, काँग्रेसची भूमिका आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत प्रश्न विचारला. त्याला त्यांनी उत्तरे दिली. याबाबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.