
पश्चिम बंगालमध्ये भाजप सोनार बांगलाच्या गोष्टी करत आहेत. मात्र संपूर्ण देशाची वाट लावून ठेकली आहे. द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही, अशी टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात प्रचारसभांना हजेरी लावण्यास राहुल गांधी सुरुवात केली आहे. दार्जिलिंग येथे आयोजित रॅलीत राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
आसाममधील जनता संस्कृती आणि इतिहासावर हल्ला होत असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयंसेवक संघ जिथे जाईल तिथे घृणा आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पश्चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, जिथे नोकऱयांसाठी कटमनी द्यावा लागतो, अशी टीका करत राहुल गांधी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
ते तुमच्याशी भांडतील, मग तुमचा विजय होईल
परदेशी कोरोना लसींना हिंदुस्थानची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंतर ते तुमच्यावर हसतील. नंतर ते तुमच्याशी भांडतील. आणि मग तुमचा विजय होईल,’ अशी खोचक टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्किट करत केली आहे.

























































