फक्त 15 मिनिटं माझ्याशी भ्रष्टाचारावर चर्चा करा, राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । राय बरेली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी फक्त 15 मिनिटे भ्रष्टाचारावर चर्चा करावी असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या चर्चेनंतर ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल असेही राहुल म्हणाले. रायबरेलीत एका रॅलीदरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो की, त्यांनी माझ्याशी 15 मिनिटे भ्रष्टाचारावर चर्चा करावी. दुध का दुध पानी का पानी होईल.” त्यानंतर नरेंद्र मोदीही देशाला तोंड सुद्धा दाखवणार नाही असा घणाघातही राहुल यांनी केला.