राहुल गांधी पॉझिटिव्ह

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मंगळवारी दिली. तरी त्यांच्या संपका&त आलेल्यांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचार सभा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या