हिंदुस्थान मोदी निर्मित आपत्तीत अडकलाय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना, अर्थव्यवस्था आणि चीनच्या मुद्दय़ाकरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थान मोदी निर्मित आपत्तीत अडकलाय, असे म्हणत देशासमोरील संकटांची यादीच त्यांनी ट्विटरवरून पोस्ट केली आहे. ‘मोदी मेड डिझास्टर’ असं म्हणत राहुल गांधी यांनी सहा मुद्दे मांडले आहेत. देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून उणे 23.9 टक्क्यांवर येणं, 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी, 12 कोटी लोकांचा रोजगार बुडणे, राज्यांना जीएसटीची रक्कम न मिळणे, कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि मृत्यू, सीमेवरील चीनची वाढती घुसखोरी. ही सर्व मोदी सरकारनिर्मित संकटं असल्याची टीका त्यांनी केली आहे.

40 वर्षांत प्रचंड मंदी

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था 40 कर्षांत प्रथमच प्रचंड मंदीत आहे. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन यासारख्या चुकीच्या निर्णयांचा हा परिणाम आहे. असंघटित अर्थक्यकस्थेकर आक्रमण करून लोकांना गुलाम बनकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत केला होता.

मुद्दाम मोदींनी देशाला आर्थिक संकटात ढकललं

देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी मोदींनी मुद्दाम हिंदुस्थानला आर्थिक संकटात ढकललं, अशी टीका केली आहे. देशातील आर्थिक संकटाचे मुख्य कारण कोरोना नसून मोदी सरकारची अयशस्वी ठरलेली धोरणं आहेत. आपली अर्थव्यवस्था कोरोनाच्या आधीच गडबडली होती. त्यावेळी सरकारने हे मान्य केलं नाही आणि ठोस उपाययोजनाही केल्या नाहीत. मुद्दाम देशाला संकटात ढकललं, असे तेजप्रताप यांनी ट्विट करत म्हटलं आहे.