काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ ट्विट करीत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. व्हिडीओमध्ये मोदी हे योगा करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारे जादुई कसरत सुरूच ठेवावी. कदाचित याच कसरतीमुळे देशाची अर्थव्यवस्था ठीक होईल, अशी उपहासात्मक टीका राहुल यांनी केली.
मोदी सरकारने शनिवारी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर लगेचच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मोदी सरकारने शेतकऱयांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ रविवारी पुन्हा त्यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले. ‘प्रिय पीएम, कृपया आपली जादुई कसरत सुरू ठेवा. कदाचित या कसरतीमुळे तरी आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल,’ असे ट्विट राहुल यांनी रविवारी केले. त्यांनी या ट्विटला पंतप्रधान मोदींचा योगा करतानाचा जुना व्हिडीओ जोडला आहे.
























































