
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागले आहेत. या आंदोलकांना रोखण्यासाठी पेंद्र सरकारकडून कशा प्रकारे बळाचा वापर केला जात आहे याबाबतचा एक फोटो ट्विटरवरून शेअर करत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या अहंकारामुळे जवान शेतकऱयांविरोधात उभे ठाकलेत, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेल्या पंजाब आणि हरयाणातील आंदोलक शेतकऱयांनी थेट दिल्ली गाठली आहे. या शेतकरी आंदोलकांना लाठीचार्ज तसेच पाण्याच्या फवाऱयांचा मारा करून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मुद्दय़ावरून शनिवारी काँग्रेसने केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी शेतकऱयांविरोधातील सरकारची ही कारवाई अहंकार असल्याचे म्हटले आहे. आपण आजवर ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत आलो, पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकारामुळे जवानच शेतकऱयांविरोधात उभे ठाकलेत, हे खूपच धोकदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. भाजपचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात तेव्हा त्यांच्यासाठी लाल चादर पसरली जाते. परंतु शेतकऱयांना दिल्लीत येताना रस्त्यात अडथळे निर्माण केले जातात. त्यांनी शेतकऱयांच्या विरोधात कायदे तयार केले ते चालते. सरकारसमोर ते आपले म्हणणे मांडण्यासाठी आले तर ते चुकीचं, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी मानसिकतेवर निशाणा साधला आहे.




























































