गरीबांच्या बँक खात्यात पैसे टाकणे हेच काँग्रेसचे मॉडेल

मूठभर श्रीमंत लोकांच्या हाती सर्व पैसा आणि संपत्ती सोपवणे हे भाजपचे मॉडेल आहे. परंतु, गरीबांच्या बँक खात्यात आणि खिशात पैसे टाकणे हे काँग्रेसचे मॉडेल आहे, अशा शब्दांत  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. कर्नाटक सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कर्नाटकातील जनतेला काँग्रेसने सहा आश्वासने दिली होती. भाजपा म्हणत होती, काँग्रेसला ही आश्वासने पूर्ण करणे जमणार नाही. आम्ही म्हणालो होतो, हजारो कोटी रुपये गरीबांच्या बँक खात्यात टाकण्यात येतील. आज हे पैसे गरीबांच्या खात्यात जमा होत आहेत. त्याचा उपयोग तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी करा, असेही राहुल गांधी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत दिलेली पाच आश्वासने पूर्ण केल्यानंतर एक लाखाहून अधिक जमीन पट्टय़ांचे वितरण करण्याबद्दलचे सहावे आश्वासनही आम्ही पूर्ण केल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिन्याला 2 हजार रुपये महिलांना देण्यात येत आहेत.