
पंजाब, जम्मू-कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हजारो कुटुंबे प्रचंड अडचणीत आहेत. त्यांची घरे, जीव आणि नातेवाईकांना वाचविण्यासाठी ही कुटुंबे धडपडत आहेत. अशा कठीण प्रसंगात केंद्र सरकारने त्यांना सक्रिय मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या राज्यांना नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
भूस्खलन आणि महापुरामुळे येथील नागरिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत, याकडे राहुल गांधी यांनी मोदींचे एक्स पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. राहुल गांधी यांनी याबाबतचा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.