राहुल गांधी उद्या हरयाणा व उत्तराखंड दौऱ्यावर

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या, 21 जानेवारी रोजी हरयाणा आणि उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दोन्ही राज्यांतील काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे शिबीर आयोजित करण्यात आले असून राहुल गांधी या शिबिरांना मार्गदर्शन करणार आहेत.

हरयाणातील कुरुक्षेत्र येथे 13 ते 22 जानेवारीदरम्यान हे शिबीर होत असून, यात हरयाणाचे 33 आणि उत्तराखंडचे 27 जिल्हाध्यक्ष सहभागी झाले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी दिली.