
सामना प्रतिनिधी । नागरकोईल
आगामी काही आठवड्यांनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदी विराजमान होतील, असे भाकीत द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी केले आहे. राहुल यांच्या उपस्थितीत आज येथे यूपीएचा भव्य निवडणूक मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. राहुल हे विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे स्टॅलीन डिसेंबरमध्ये चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज केला आहे.
राहुल यांच्या हातात देशाचे भवितव्य सुरक्षित राहील असे स्पष्ट करून स्टॅलीन पुढे म्हणाले, रालोआच्या कार्यकाळात देशाची प्रगती झाली नाही. मोदी हे रोजगार निर्माण करतील अशी तरुणांना अपेक्षा होती, परंतु मोदी यांनी काहीच केले नाही असेही ते म्हणाले.























































