जालन्यात सुगंधी तंबाखू, हातभट्टी, जुगार अड्ड्यांवर छापे; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

538

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात व आजूबाजूच्या परिसरात अंबड पोलिसांनी विविध ठिकाणी अचानक छापे मारुन वेगवेगळ्या कंपन्यांची सुगंधी तंबाखू, हातभट्टीची दारु, दारुसाठी लगणारी रसायने जप्त केली. तसेच जुगाराच्या अड्ड्यांवरही छापे टाकले. या कारवाईत 2 लाख 53 हजार 436 रुपयांचा मोठा साठा जप्त केला असून 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंबड शहरात व आजुबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी सुगंधी तंबाखू, हातभट्टीची दारु असल्याची तसेच काही ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाईसाठी पथकाला पाठवण्यात आले. पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल 2 लाख 53 हजार 436 रुपयांचा मोठा साठा जप्त केला असून 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या