रायगड जिल्ह्यात 22 लाख 73 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

599

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. रायगड  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण  78  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2 हजार 714 मतदान केंद्रावरमतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

रायगड जिल्ह्यात  पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन व महाड असे सात विधानसभा  मतदारसंघ आहेत. पनवेल विधानसभा मतदार संघात 10, कर्जतमध्ये  11, उरणमध्ये  8 ,  पेण  14, अलिबाग 13,,  श्रीवर्धन 14 , महाड  8  असे एकूण 78 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

जिल्ह्यात 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार व इतर 5 चा समावेश आहे.   जिल्ह्यात 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी 2 हजार 714 मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे.

निवडणूकीच्या कामासाठी 12 हजार 697 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सात हजार 433 पुरुष आणि पाच हजार 264 महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणो 1 हजार 905 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 41 भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. 3013 मतदान युनिट आणि तेवढेच मतदान यंत्र, 3450 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाले आहेत.

विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखली जावी यासाठी  जिल्‍हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.  रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 3 हजार 483 पोलीसांच्या ताफ्यासह 5 केंद्रीय सुरक्षा बलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.  पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे. जिल्हयात 134 पोलीस अधिकारी,  दोन हजार 103 कर्मचारी,  एक हजार 246 होमगार्ड तसेच केंद्रीय सुरक्षा बल विभागाच्या पाच कंपन्या अशी सुरक्षा व्‍यवस्‍था सज्‍ज आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या