
ग्रामीण भागातील मिनी विधानसभा असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गट व पंचायत समित्यांच्या ११८ गणांचे मतमोजणीनंतर आज निकाल लागले, यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे १८ शिलेदार दणदणीत मतांनी विजयी झाले. यामध्ये जिल्हा परिषदेचे ५ तर पंचायत समितीच्या १३ उमेदवारांचा समावेश आहे. नागोठणे, खालापूर, कर्जत, पेण, पाली, उरण, पनवेलच्या गट आणि गणात मशाल धगधगली. शिवसैनिकांसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मुलालाची उधळण आणि फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. जिल्हा परिषदेत भाजपचे १५, शिंद गटाचे २१, अजित पवार गटाचे १६, काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले. शेतकरी कामगार पक्षाला खातेही उघडता आले नाही. कुणालाही बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था झाली असून भाजप, शिदि गट, अजित पवार गटात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडाला होता. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शिंद गटासह अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तिरंगी लढतीमुळे सर्वच ठिकाणी चुरशीने आणि अटीतटीने निवडणूक झाल्या. ७फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर आज पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोह, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन पेण : पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिहू गट व गणात शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भगवा फडकवला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या पत्नी पल्लवी भोईर यांनी शिहू गटात भाजपचे आमदार रवी पाटील यांची सून शर्मिला पाटील यांचा ४०७३ मतांनी पराभव केला. पंचायत समिती निवडणुकीत प्रीती पाटील यांनी गडब गणातून ६९७४ मते मिळवून विजय मिळवला, तर शिहू गणातून संजय भोईर यांनी ५४८३ मते मिळवून भगवा फडकवला.
नागोठणे: रोहा पंचायत समिती सुकेळी गणातून शिवसेनेच्या अरुणा हंबीर यांनी विजय मिळवला, अरुणा हंबीर यांना ५५४८ मते मिळाली.
चौक : चौक जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वैशाली सखैर यांचा विजय झाला. त्यांना ११५४५ मते मिळाली. चौक गणातून शिवसेनेच्या कमल भरमा विजयी झाल्या. त्यांना ५२०८ मते मिळाली, तर सावरोली गणातून शिवसेनेच्या प्रमिला पाटील बिजयी झाल्या. त्यांना ५९९५ मते मिळाली.
कर्जत: नेरळ जिल्हा
परिषद गटात सुनिता मोरे यांना १०७४७ मिळाली. त्यांचा ८८३ मतांनी विजय झाला, तर कहाव पंचायत समिती गणात सुषमा पवाळी यांना ५६५६ मते मिळाली. त्यांचा ६९९ मतांनी विजय झाला. कळंब पंचायत समिती गणातून कमळाबाई शिंगवा यांना ६४७५ मते मिळाली. त्यांचा १७४७ मतांनी विजय झाला, उकुळ पंचायत समिती गणात नमिता श्रीखंडे यांना ५५१९ मते मिळाली. त्यांचा २७४९ मतांनी विजय झाला.
पाली : परळी गणात शिवसेनेच्या प्रणिता परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा पराभव केला. प्रणिता परदेशी यांना ५६८३ मते मिळाली, प्रणिता परदेशी यांचा २५८८ मतांनी विजयी झाल्या.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाळ २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला
२०२२ पासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट.
जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती निवडीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा धक्का
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना मतदारांनी जोरदार धक्का दिला. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील व सून जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील या सध्या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. चित्रा पाटील यांचा रसिका केणी यांनी पराभव केला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे भाजपमध्ये असून, पंडित पाटील यांचे पुत्र सुप्रभात पाटील यांचा अलिबाग तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटात पराभव झाला. अजित पवार गटाचे उमेदवार अमित नाईक यांनी येथे विजय मिळवला, भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील यांचा सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गटात शर्मिला बोडके यांनी पराभव केला.
भाजप आमदार रवींद्र पाटील यांची सून शार्मिला पाटील पेण तालुक्यातील शिहू गटातून निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार पल्लवी भोईर यांनी पराभवाची धूळ चारली. तसेच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. राजीव साबळे यांना निजामपूर जिल्हा परिषद गटात अविनाश नलावडे यांच्याकडून पराभव सहन करावा लागला, शिदि गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सून श्वेता बोरवे यांचा वेणगाव पंचायत समिती गणातून पराभव झाला, ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुमित काटे यांनी पराभव केला. शिवसेनेशी प्रतारणा केलेल्या किशोर जैन यांना नागोठणेकरांनी कात्रजचा घाट दाखविल्याची टीका माजी शहरप्रमुख कीर्तिकुमार कळस यांनी केली.
शेकाप झेडपीतून ‘आऊट’
एकेकाळी रायगड जिल्हयात एकहाती हुकुमत गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे या निवडणुकीत अक्षरशः पानीपत झाले. या निवडणुकीत शेकापला जिल्हा परिषद गटात एकही जागा जिंकता न आल्याने शेतकरी कामगार पक्ष झेडपीतून सपशेल ‘आऊट’
२०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शेकापने सर्वात जास्त २३ जागांवर विजय मिळविला होता. मात्र आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापला भोपळाही फोडता आला नाही. शेकापचे प्रभाकर पाटील हे १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर शेकापतर्फे सुप्रिया पाटील १९९९ ते २००२, बाळाराम पाटील २००५ ते २००७, नीलिमा पाटील २००७ ते २००९, सुभाष पाटील २००९ ते २०१२, कविता गायकवाड २०१२ ते २०१४, योगिता पारधी २०२० ते २०२२ या कालावधीत अध्यक्षपद भूषविले, २०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने २३ जागांवर विजय मिळविला होता, तर शिवसेना १८, राष्ट्रबादी काँग्रेस १२, काँग्रेस ३ व भाजपने ३ जागांवर विजय मिळविला होता. यानंतर शेकाप व राष्ट्रबादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व शेवटची अडीच वर्षे शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, मात्र सध्या शेकापची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. अनेक पदाचिकारी पक्षाची साथ सोइन इतर राजकीय पक्षांमध्ये गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शेकापने मित्रपक्षांच्या सहाय्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरविले होते. मात्र या सर्व उमेदवारांना निवडणुकीत अपयश आले असून शेकापची पाटी कोरी राहिली































































