
दिवाळी महिनाभरावर आली असतानाच केंद्र सरकारने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या बोनसची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा देशभरातील 10.9 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळणार आहे. या बोनससाठी सरकारने 1865.68 कोटी रुपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.