45 पैशांत मिळणार रेल्वे प्रवासी विमा

रेल्वेचे ई-तिकीट खरेदी करताना सर्व करांसह केवळ 45 पैसे भरून पर्यायी प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली. ही योजना ऐच्छिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रवासी ऑनलाईन पद्धतीने किंवा आरक्षण काऊंटरवर तिकिटे बुक करू शकतात. ज्यांनी तिकीट ऑनलाईन बुक केले आहे आणि ते कन्फर्म्ड झाले आहे अशा प्रवाशांनाच या विम्याचा लाभ घेता येईल, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.