Government Jobs – रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती, दहावी-आयटीआय पास तरुणांसाठी सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वेत दहावी आणि आयटीआय पास तरुणांसाठी भरती होत आहे. रेल्वे भरती कक्ष, पूर्वोत्तर रेल्वेने (आरआरसी एनईआर) गोरखपूर, इज्जतनगर, लखनौ, गोंडा आणि वाराणसी येथील वर्कशॉपमधील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. 1104 पदांसाठी अर्ज मागण्यात येत असून 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात उमेदवाराला अर्ज करता येईल.

गोरखपूर येथे मेकॅनिकल वर्कशॉपसाठी 390 जागा, सिग्नल वर्कशॉपसाठी 63 जागा, ब्रिज वर्कशॉपसाठी 35 जागा आहेत. तर इज्जतनगर येथे मेकॅनिकल वर्कशॉपसाठी 142, डिझेल शेडसाठी 60, कॅरेज आणि व्हॅगनसाठी 64 पदांसाठी भरती होत आहे. लखनौ जंक्शन येथे कॅरेज आणि व्हॅगनसाठी 149 जागा, गोंडा येथे डिझेल शेडसाठी 88 जागा आहेत. वाराणसी येथे कॅरेज आणि व्हॅगनसाठी 73, तर टीआरडीसाठी 40 जागा अशा एकूण 1104 पदांसाठी भरती होत आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, दहावीची गुणपत्रिका, आयटीआय डिप्लोमा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी, सही किंवा अंगठ्याचा ठसा. उमेदवार कमीत कमी 50 टक्क्यांसह दहावी पास असावा. तसेच त्याच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट असावे.

कुठे करता येणार अर्ज

उमेदवार ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे, तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुक्ल नाही.

वयोमर्यादा

कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 24 वर्ष. मागावर्गीय उमेदवाराशाठी जास्तीत जास्त 27 वर्ष, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 29 वर्ष वयोमर्यदा आहे. दिव्यांगांसाठी ही वयोमर्यादा 34 वर्षांपर्यंत आहे.

अर्ज करण्याची तारीख 

या सर्व पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.