
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वे मधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला शिवसेनेने आज धारेवर धरलं. शुक्रवार ५ ऑक्टोबर, २०१८ रोजी, स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने, शिवसेना सचिव व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मुंबई रेल्वे बोर्ड, मुंबई सेंट्रल येथे दुपारी २.०० वाजता जोरदार आंदोलन करण्यात आलं. मराठी मुलांना नोकऱ्यांमध्ये डावलून चालणार नाही, असा इशारा यावेळी रेल्वे प्रशासनाला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
सर्व फोटो: सचिन वैद्य


























































