सुट्टीच्या काळ्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने, तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. हे लक्षात घेता विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
ही मोहिम 1 ते 15 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. यादरम्यान लोकल तसेच रेल्वेच्या आरक्षित, अनारक्षित डब्यांमध्ये किंवा स्थानकांवर अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.