
ॲपच्या माध्यमातून पावसाला नियंत्रित करता येईल असा अजब दावा उत्तराखंडचे मंत्री धन सिंह रावत यांनी केला आहे. या ॲपमुळे पाऊस कमी जास्त करता येईल असे रावत म्हणाले आहेत.
धन सिंह रावत हे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री आहेत. रावत म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी रुरकी यांनी मिळून एक ॲप विकसित केले आहे, त्यामुळे एखादी नैसर्गिक आपत्ती कधी येणार याचा अंदाज बांधता येऊ शकेल. तसेच आगामी काळात एक असे ॲप विकसित होणार आहे ज्यामुळे पाऊस नियंत्रित करता येऊ शकेल. या ॲपच्या माध्यमातून पाऊस पडण्याचे प्रमाण कमी जास्त येईल असा दावाही रावत यांनी केला आहे.
ॲपच्या माध्यमातून पावसाला नियंत्रित करता येणार असा अजब दावा उत्तराखंडचे मंत्री धन सिंह रावत यांनी केला आहे. या ॲपमुळे पाऊस कमी जास्त करता येईल असे रावत म्हणाले आहेत.#rain #DhanSinghRawat pic.twitter.com/WncKAiBP26
— Saamana (@SaamanaOnline) August 31, 2021



























































