
सामना प्रतिनिधी, हिंगोली
मागील तीन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे हिंगोली शहरामध्ये आज पुन्हा जोरदार आगमन झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने तब्बल अर्धा तास जोरदार बरसात केली. या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले असून नाल्यातील पाणीही रस्त्यावर आले आहे.
हिंगोली शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच भूमिगत गटार योजनेसाठी योजनेच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक व नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे.





















































