
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण किनारपट्टीवर धडकलेले ‘महा’चक्रीवादळ आता आणखी वेगाने घोंगावणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळामुळे 6 ते 8 नोव्हेंबर हे तीन दिवस मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे तीन दिवस मच्छीमारांसाठी खूपच धोक्याचे आहेत.
- शुक्रवारपासूनच मुंबईसह उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसेच कोकणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे कोकणसह अन्य भागातील पिकांचे खूपच नुकसान झाले. शेतकऱयांची पिके वाहून गेली.
- येणाऱया तीन दिवसांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
- 8 नोव्हेंबरपर्यंत उत्तर कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला असून कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
- समुद्रात वाऱयाचा वेग वाढणार असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.
- आधीच समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना किनाऱयाकडे परतण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.































































