हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी दुपारी पावसाचे जोरदार आगमन झाले. हिंगोलीत तब्बल अर्धा तास पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. हिंगोलीत सकाळी कडक ऊन पडले होते, मात्र दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वातावरणात गारवा निर्माण झाला आणि हवामान ढगाळ झाले. काही ठिकाणी पावसाने जवळपास अर्धा तास रिमझीम हजेरी लावून विश्रांती घेतली.

दुपारी चारच्या सुमारास शहरातील सर्वच भागात पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. हिंगोलीत झालेल्या पावसाने रस्त्यावरही साचले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच ताराबंळ उडाली. मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या