कवठे येमाई परिसरात अर्धा तास दमदार पाऊस; शेतीच्या कामांना वेग

411

शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई आणि परिसरात शनिवारी दुपारी मॉन्सूनचा जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. खरीपातील पिकांच्या मशागती आणि पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सकाळपासून कवठे येमाई आणि परिसरात पावसाळी वातावरण नव्हते. मात्र, अचानक दुपारी ढग दाटून आले आणि सुमारे अर्धा तास जोरदार सरी बरसल्या. पहिल्याच पावसात शेतातून, रस्त्यांच्या कडेने व गावठाणातून पावसाचे पाणी भरून वाहू लागले. या जोरदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या