मध्य मुंबई, घाटकोपर परिसरात रिमझिम पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच आज सायंकाळी अचानक मध्य मुंबईत माहीम, शीव, ऍण्टॉप हिलबरोबरच घाटकोपर, सांताक्रुझ, वांद्रे पसिरात रिमझिम पाऊस झाला. उत्तर हिंदुस्थानात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी रिमझिम पाऊस झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.