रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस; संगमेश्वरात सर्वाधिक 28 मिमी पावसाची नोंद

395

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूर्व मौसमी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली़. दुपारनंतर परत पावसाला सुरुवात झाली़. रविवारी जिल्ह्यात पावसाची एकूण 81 मिमी म्हणजेच सरासरी 9 मिमी एवढी नोंद झाली़. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात झाला़. येथे 28 मिमी पावसाची नोंद झाली आहे़. तर खेड येथे 9 मिमी, चिपळूण येथे 6 मिमी, रत्नागिरी येथे 5 मिमी, लांजा येथे 15 मिमी आणि राजापूर येथे 18 मिमी पाऊस पडला़. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत होता.

आपली प्रतिक्रिया द्या