पावसाचा रामराम, महाराष्ट्रात मात्र परतीचे तिकीट मिळाले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

अखेर पावसाने आजपासून रामराम ठोकल्याचे हवामान विभागाने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. यंदा देशात नऊ टक्के कमी पाऊस पडल्याची नोंद झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. सलग दुसऱया वर्षी कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्यातून पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून गायब होईल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

देशभरात यंदा सरासरी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता, परंतु हवामान विभागाचा हा अंदाज चुकला असून देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात केवळ 76 टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी सांगितले. दरम्यान, उत्तरेकडे कच्छ, सौराष्ट्र, राजस्थान पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली. मात्र देशभरात चांगला पाऊस पडल्याचे पदार्थविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले.

बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल, कच्छ, सौराष्ट्र, राजस्थान पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली. केरळमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. प्रचंड पावसामुळे या ठिकाणी महाप्रलय आला. यंदा 29 ते 30 दिवस उशिरा पावसाने देशातून काढता पाय घेतला. देशभरात एकूण 91 टक्के पाऊस पडला. ही नोंद सरासरीपेक्षा कमी आहे.

3-4 ऑक्टोबरला मुंबईत मुसळधार
येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

महिना  पावसाची नोंद
जून      95 टक्के
जुलै      94 टक्के
ऑगस्ट   92 टक्के
सप्टेंबर    76 टक्के

summary- rain on its way to return