
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा 27 जानेवारी रोजी विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते.
अमित ठाकरे यांचा विवाह फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी होणार आहे. 27 जानेवारी रोजी लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबाची भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांच्यामध्ये कौटुंबिक चर्चा झाली.

























































