
‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण 5 जून रोजी अयोध्या दौऱयावर जाणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेमध्ये केली. आपल्या सहकाऱयांसह आपण अयोध्येला जाऊन दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे हे पुणे दौऱयावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































